आपला जिल्हा

मुधोजी हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा १० वीचा उज्ज्वल निकाल- कु. जान्हवी लांडगे ९६.४० गुण मिळवून ठरली प्रथम

फलटण (प्रतिनिधी) – येथील मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा यंदाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून, कु. जान्हवी लांडगे हिने ९६.४०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे तसेच परिसराचे नाव उज्ज्वल झाले आहे.

जान्हवीने सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य वेळेचे नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश संपादन केले. तिच्या यशामागे तिच्या पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे तिने सांगितले.

शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत शाळेचा निकाल उंचावला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सौ. वैशाली चोरमले, सातारा जिल्हा खो- खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, प्रशासन अधिकारी अरविंद निकम, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

पालक व नागरिकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!