(फलटण/ प्रतिनिधी ) फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी ‘मेगा कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २० नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला असून १४७ विद्यार्थ्यांनी मुलाखतीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मेगा प्लेसमेंट कॅम्पस ड्रायव्हमधून एकूण 105 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांकडून निवड करण्यात आली. महाविद्यालयामध्ये मेगा प्लेसमेंट कॅम्पस ड्रायव्ह फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयीन समितीचे व्हॉईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंदराव निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्यानविद्या व कृषि क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या विविध रोजगार संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या मेगा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये विविध अग्रगण्य कृषी, अॅग्री-टेक व अॅग्री-बिझनेस क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राशी थेट संवाद साधण्याची व आपल्या कौशल्यांची चाचणी घेण्याची ही सुवर्णसंधी ठरली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. डी. निंबाळकर, प्राचार्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व डॉ. यू. डी. चव्हाण, प्राचार्य कृषी महाविद्यालय, फलटण यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्लेसमेंट समन्वयक प्रा. ए. ए. शिंदे व डॉ. एन. ए. यादव यांनी नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळण्यास मदत होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा रोजगाराभिमुख उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. फलटण परिसरात शिक्षण व उद्योग यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले. फलटण पंचक्रोशीतील उद्यानविद्या व कृषि पदवीधरांना मेघा प्लेसमेंटद्वारे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण तर्फे पदवी पुर्ण झाल्या नंतर भविष्यातील नोकरी व्यवसायासाठी भरघोस सहकार्य लाभत आहे. मेघा प्लेसमेंट ड्राइव्ह मध्ये सहभागी झालेल्या विविध अग्रगण्य कंपन्यांचे आयोजकांनी आभार व्यक्त केले.
मेघा प्लेसमेंटद्वारे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालय, फलटण येथील माजी विद्यार्थ्यांची निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, में गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी प्रा. अरविंद निकम सर, में गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व दोन्ही महाविद्यालयाचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.