महाराष्ट्र
जिंतीत मानवी संवेदनांचा विजय ; ४ वर्षांची जट अखेर काढली


मिळालेल्या माहितीनुसार, कोविड-१९च्या काळात सदर महिला गंभीर आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या काळात उपचार सुरू असल्याने आणि आजारपणामुळे शरीर कमकुवत झाल्याने महिलेला सतत अशक्तपणा जाणवत होता. उपचारानंतर प्रकृती सुधारली असली तरी कोविडच्या काळात दवाखान्यात सुरुवातीला केस थोडे थोडे गुंतू लागले. काही दिवसांनी केसांमध्ये गाठी पडू लागल्या. महिन्यांमधून केसांची अवस्था अधिकच बिकट होत गेली आणि हळूहळू संपूर्ण केस जटेत बदलले. त्यामुळे डोक्यावर सतत खाज सुटणे, डोकेदुखी, अस्वस्थता, झोप न लागणे तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.