(जावली /अजिंक्य आढाव )जावली परिसरात श्रद्धा, उत्साह आणि भक्तीभावाच्या वातावरणात जोगेश्वरी-सिद्धनाथ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत “चांगभलं… चांगभलं…”च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेत नवस फेडले. परिसरात ढोल-ताशांच्या निनादाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या सोहळ्यादरम्यान प्रा.अमोल चवरे रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी लाभ घेतला. स्थानिक ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करण्यात आले होते.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेला हा सोहळा भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरला.