आपला जिल्हा
सातारा जिल्ह्यातील 1013 ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार , इच्छुकांची धाकधूक वाढली.

(सातारा/ प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १०१३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून जून ते जुलै दरम्यान विविध टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढली जाणार आहे.
आरक्षण सोडतीचा वेळापत्रक अस असेल :
– ८ जून:विशेष ग्रामसभेची सूचना जारी
– १२ जून:विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढली जाणार
– १७ जून: प्रभागनिहाय आरक्षणाच्या प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
– १९ जून: प्रारूप आरक्षण प्रसिद्ध– २५ जूनपर्यंत: नागरिकांच्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार
– ३ जुलै: प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय
– ८ जुलै:अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता
– १० जुलै: अंतिम प्रभाग रचना व आरक्षण जाहीर



