(जावली /अजिंक्य आढाव )जावली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत गुरव, घडशी, कोळी आणि डवरी समाजाकडून ठोस भूमिका घेत उमेदवारीची मागणी करण्यात येत आहे. संबंधित समाजातील प्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी आपला सहभाग आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.
या समाजघटकांचा दावा आहे की, ग्रामपंचायतीच्या कारभारात सर्व समाजांना समतोल प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. मूलभूत प्रश्नांवर प्रभावी काम करण्यासाठी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, गावातील इतर राजकीय गट आणि इच्छुक उमेदवार देखील निवडणुकीच्या तयारीला लागले असून, पुढील काही दिवसांत अधिकृत उमेदवारी बाबत वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जावली ग्रामपंचायत निवडणूक 2026 ही चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.