आपला जिल्हाताज्या घडामोडी

रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली चे शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तेची छाप : सात विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

(जावली/अजिंक्य आढाव )– जावली येथील जाई एज्युकेशन सोसायटी संचलित रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 2025-26 च्या परीक्षेत शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवत तब्बल ₹3 लाख 50 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे मानकरी होण्याचा मान मिळवला आहे.

यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
कुमारी . सिद्धी प्रकाश चवरे
कुमारी . रुचिता सतीश माने
कुमार . विशाल धनाजी सुळ
कुमार . अथर्व अमोल माने
कुमार . कृष्णा मनोहर कचरे
कुमार . साहिल रामदास चवरे
कुमार . विनय प्रदीपकुमार आवटे

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दशरथ चवरे, संस्थापक सचिव श्री. अमोल चवरे, प्राचार्या सौ. कांचन मॅडम तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जावली परिसरात या यशाबद्दल आनंदाचे वातावरण असून शाळेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!