आपला जिल्हा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने 28 रोजी बरड येथे बैलगाडा शर्यतीचा थरार..!

(जावली / अजिंक्य आढाव) – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बरड (ता. फलटण) येथे 28 रोजी भव्य आणि दिमाखदार ‘हिंदू हृदय सम्राट केसरी बैलगाडा शर्यत (एक आदत, एक बैल)स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामीण परंपरेचा अभिमान असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी संपूर्ण परिसर सज्ज झाला असून, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही शर्यत रंगणार आहे. दमदार बैलांची ताकद, मालकांचा आत्मविश्वास आणि मैदानावरील जल्लोष यामुळे बरड गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून ‘केसरी’ किताबासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. शर्यतीत सहभागी होण्यासाठी विविध भागांतून स्पर्धक दाखल होत असून मैदानावर जोरदार तयारी सुरू आहे.

आयोजकांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिस्त व सुरक्षितता पाळत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!