जावली ग्रामपंचायत निवडणूकीसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी:भारतीय जनता पक्ष निवडणूक रिंगणात
जावली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्व साधारण आरक्षण जाहीर

(जावली/ अजिंक्य आढाव )-जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा खाली बसतोय ना तोच ग्रामपंचायत निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..?
1. राजकीय गटांची लढत : राजे गट, शिवसेना, राष्ट्रवादी समाज पक्ष आणि भाजप, यांच्यात तगडी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
2. राजकीय युती : राजे गट आणि रासप एकत्र लढणार का, की भाजप-रासप युती होणार, याबद्दल अंदाज लावले जात आहेत.
3. सरपंच पदाची निवडणूक : शासनाच्या निर्णयानुसार थेट जनतेतून सरपंच पदासाठी निवड होणार आहे, ज्यामुळे मतदान प्रक्रिया सोपी झाली आहे.
4. गावातील राजकीय चर्चा : गटप्रमुख गाठीभेटी आणि मतभेद बाजूला ठेवून समजूत काढण्याचे प्रयत्न होत आहेत.
सन 2026 मध्ये मुदत संपत आल्याने ग्रामपंचायत निवडणूक होणार..? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत पक्षाच्या माध्यमातून गट बांधणी केल्याने स्थानिक राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
या पूर्व ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष विरुद्ध राजे गट अशी लढत पाहायला मिळाली होती.यात राजे गटाचे 6 तर 3 रासपचे सदस्य निवडून आले होते. गत वर्षाच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार का..?
राज्याच्या सत्तेत असलेला पक्ष भारतीय जनता पार्टी या वर्षी जावली ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतणार असुन गट प्रमुखांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.यातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत 9 सदस्यां पैकी 4 सदस्य राजेगट कडे तर भाजप पक्ष प्रवेशातुन 2, रासप कडे 3 सदस्य संख्या असुन गत महिन्यातील निवडणुकीच्या आकडेवारीत राजेगटाकडे एकुण मतदान पैकी 115 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसुन आले.



