(जावली /अजिंक्य आढाव)- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बरड जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना राजे गटविरुद्ध भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चौरंगी लढतीमुळे ही लढाई प्रतिष्ठेची मांडली जात आहे.
प्रचार थांबला तरी मतदारांच्या गाठीभेटी गट फोडणे गाव की भाऊकीला साद घालून त्यांना आपलेसे करणे दुखावल्यांची समजूत घालणे आणि आगामी काळातील होणाऱ्या संधीच्या आश्वासनासोबत लक्ष्मी दर्शनाची कृपा प्रसाद देऊन आपले उमेदवाराच्या विजयाची गणिते सांगणे . मतदानाच्या दिवसापर्यंत हक्काचा मतदार फुटू नये यावरही आज नजर ठेवण्याची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवरती दिली गेली आहे त्यामुळे दोन दिवस झाले गावांमध्ये जागता पाहारा पाहायला मिळत आहे.
या निवडणूकी नंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत त्यासाठी आपल्या पक्षाचा योग्य नेता निवडण्याचे प्रक्रिया या निवडणुकीतील कामावरून ठरवले जाणार आहे त्यामुळे नेत्यांच्या मनात घरकरण्यासाठी गावपातळीवरील प्रमुख नेते जोर लावून काम करू लागले आहेत शेवटचे दोन दिवस मतांची जुळवणुक करून आपले गट आणि गणातील उमेदवारांना सेफ करण्यासाठी भर दिला जात आहे.
एका गावतील ही मतदान ठरु शकते निर्णयाक
या निडणुकीत गटातील प्रत्येक गावात मताचे महत्त्व प्रचंड वाढले आहे, बुथनिहाय कार्यकर्त्याची नियुक्ती मतदारांची गाव निहाय यादी मतदानाच्या दिवशी संपर्क मोहीम वाहन व्यवस्था असे सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. अनेक उमेदवारांनी वैयक्तिक संपर्क वाढवला असून मतदारांचे ते संवाद साधून विकास कामांच्या हमी दिली जात आहे दरम्यान एका गावातील मते निर्णय करू शकतात अशी परिस्थिती असून तालुक्यातील मोठे व त्यांचे गावी पक्षांची नेते उमेदवार त्यांच्या समर्थकांचे कॅच करण्यास सुरुवात केली आहे.
बरड जिल्हा परिषद गटात बरड, बागेवाडी,रांजणी (पुनर्वसन),जावली, आंदरूड, कुरवली बु, दत्तनगर, राजूरी, भवानीनगर, विवर(पुनर्वसन) या गावांचा समावेश असून दुधेबावी गणात दुधेबावी, विवर, मिरडे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोमवाडी, वडले,भाडळी बु, सासकल, तिरकवाडी, भाडळी खुर्द यामधुन मतदार उद्या उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.