आपला जिल्हा
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे हॉटेल, धाब्यांवरती फुल गर्दी

(जावली/ अजिंक्य आढाव )हॉटेल, ढाब्या वर फुल गर्दी व्यवसायाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमुळे चलती आली आहे. ढाबे, हॉटेल आता गर्दीने फुल होऊ लागले असून, राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच उमेदवारांनी जेवणावळीचा सपाटा लावला आहे. सामिष आहाराला पसंती असून, मतदान होईपर्यंत जेवणावळीचे सत्र सुरूच राहणार आहे. हॉटेल व्यवसायावरील मंदीचे सावट काहीसे दूर झाले आहे.




