(फलटण / प्रतिनिधी):पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो, पण जेव्हा एखादे दैनिक स्वतःच्या फायद्यासाठी आणि राजकीय स्वार्थासाठी सत्याचा गळा घोटते, तेव्हा जनतेच्या दरबारात त्याची विश्वासार्हता संपते. ‘दैनिक स्थैर्य’ ने नुकतेच प्रसिद्ध केलेले व्ह्यूजचे आकडे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच प्रकार असून, फलटणच्या जनतेची दिशाभूल करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आता चव्हाट्यावर आला आहे.
११ दिवसांची पुण्याई अन् काही तासांची कमाई ! स्थैर्यने स्वतःच्या मुलाखतीला ६७०० व्ह्यूज असल्याचे मिरवले आहे, पण हे सांगताना त्यांनी एक मोठी गोम लपवली. त्यांचा हा व्हिडिओ ११ दिवसांपूर्वी अपलोड झालेला आहे. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मुलाखत स्थैर्यने चॅनेलने घेतली आहे व आपल्या एकाच चॅनलला प्रसिद्ध झाली आहे. मात्र श्रीमंत संजीवराजे यांची मुलाखत सर्व चॅनेलसाठी खुली करण्यात आली आहे त्यामुळे प्रत्येकाच्या व्ह्यूज वेगवेगळ्या दिसत आहेत हे ही स्थैर्यने लक्षात घ्यावे.
याउलट, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मुलाखत घेणाऱ्या इतर चॅनेल्सनी हा व्हिडिओ अवघ्या काही तासांपूर्वी अपलोड केला होता. ११ दिवसांच्या ‘शिळ्या’ व्ह्यूजची तुलना तासाभराच्या ‘ताज्या’ व्ह्यूजशी करून स्वतःला ‘ब्रँड’ म्हणवून घेणे म्हणजे सूर्यासमोर दिवा धरण्यासारखेच आहे.
राजकीय पादस्पर्श आणि बदललेली निष्ठा
कालपर्यंत राजे गटाच्या जीवावर मोठे झालेले ‘स्थैर्य’चे सर्वेसर्वा, आज राजे गटाने डावलल्यावर थेट खासदारांच्या तंबूत शिरले आहेत. आपली राजकीय सोय पाहण्यासाठी दुसऱ्या चॅनेल्सना व आपली पत्रकारिता पैशाने विकणाऱ्यांनी दुसऱ्या चॅनेलची तुलना करू नये. (नमस्ते फलटण, आस्था टाईम्स, श्रीहरी सुभाषित, युवा जनमत, इ.) कमी लेखणे ही प्रवृत्ती फलटणच्या पत्रकारितेला काळिमा फासणारी आहे. प्रसन्न रुद्रभटे हे हुशार मानले जातात, पण दुसऱ्याची बदनामी करून स्वतःचे घर भरण्याची ही पद्धत त्यांना शोभणारी नाही.
स्थैर्य ला इशारा: जनता सगळं जाणते.दुसऱ्या न्यूज चॅनेल्सना बदनाम करून तुम्ही तुमचे वर्चस्व गाजवू शकत नाही. सोशल मीडियावरील पब्लिकला आता ‘फेक नरेटिव्ह’ समजू लागले आहेत. ११ दिवसांनंतरही जेमतेम काही हजार व्ह्यूज मिळवणारे स्वतःला ‘ब्रँड’ समजत असतील, तर त्यांनी लक्षात ठेवावे की, राजे गटाची ताकद आणि जनतेचे प्रेम हे अशा खोट्या आकडेवारीवर अवलंबून नाही.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि आकडेवारीचा खेळ करून स्वतःला मोठे समजणाऱ्यांना येणारा काळच त्यांची खरी जागा दाखवून देईल. पत्रकारिताच करावयाची असेल तर निरपेक्ष भावनेने पत्रकारिता करा हेच या निमित्ताने आम्हाला सांगावयाचे आहे.