(जावली /अजिंक्य आढाव ): दिल्ली येथील जंतर-मंतरवर संविधान मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवार, दि. 23 जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंजवडी येथील व्यावसायिक, दुकानदार तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला.
या बंदच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला. गावातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी ऐक्य व्यक्त करण्यात आले. तसेच संविधानिक मूल्यांचे संरक्षण, लोकशाही हक्कांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मुंजवडी ग्रामस्थ व व्यापारी वर्गाने शांततापूर्ण पद्धतीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.