(जावली /अजिंक्य आढाव ): जावली परिसरात रानडुक्कर आणि बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेती परिसर तसेच मळ्यांमध्ये या वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यांवरून तसेच शेतशिवारातून ये-जा करताना नागरिकांना वन्यप्राण्यांचा सामना होण्याची भीती नाकारता येत नाही रानडुकरांकडून शेती पिकांचे नुकसान होत असून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वनविभागाने जावली परिसरात तातडीने पाहणी करून वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, लहान मुले व पाळीव जनावरांची काळजी घ्यावी आणि वन्यप्राणी दिसल्यास त्याच्या जवळ न जाता तातडीने संबंधित वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.