JEE Main व NEET-UG मध्ये दुहेरी यश ; स्वराली वेदपाठकचा धुळदेव येथे गौरव
स्वरालीने JEE Main 2026 सत्र-1 मध्ये 97.388 NTA स्कोअर मिळवला असून, NEET-UG 2026 परीक्षेत 720 पैकी 547 गुण (97.99 टक्के) प्राप्त केले आहेत. तसेच तिने ऑल इंडिया रँक 40,123 मिळवत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशाच्या दोन्ही राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव येथील स्वरालीचे माजी शिक्षक तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी येथील प्रयोगशील शिक्षक आयु. बाबासाहेब जगताप, कै. मल्हारराव सस्ते हायस्कूल, सस्तेवाडी येथील शिक्षक बजरंग गायकवाड, प्रगत शिक्षण संस्थेचे जनसंपर्क अधिकारी सोमीनाथ घोरपडे तसेच सामाजिक कार्यकर्ते आयु. आनंद जगताप यांनी तिच्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.