(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील तावडी गावची कन्या कु. शिवांजली शालिनी रणधीर भोसले हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टर (क्लास-२) पदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पहिल्याच प्रयत्नात राज्याच्या ओपन मेरिटमध्ये 38 वा क्रमांक तर मागासवर्गीय प्रवर्गातून महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक मिळवत यशाची नवी उंची गाठली आहे.