(फलटण/ प्रतिनिधी): गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार पेठ येथील उघडा मारुती मंदिर परिसरात रविवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत सन २०२६-२७ या वर्षासाठी मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
बैठकीची सुरुवात मंडळाचे माजी अध्यक्ष, मार्गदर्शक तसेच फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक कै. प्रकाश (नाना) लालासाहेब पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कै. पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर मंडळाचे गतवर्षीचे अध्यक्ष श्री. नितीन मारुतराव चोरमले व गतवर्षीचे उपाध्यक्ष श्री. किरण हिरालाल शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवासाठी पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
यामध्ये सन २०२६-२७ साठी मंडळाच्या अध्यक्षपदी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. रविंद्र (नाना) दत्तात्रय जंगम यांची, तर उपाध्यक्षपदी श्री. संजय साहेबराव शिंदे यांची निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल उपस्थित सर्व आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.बैठकीदरम्यान आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, मंडळाच्या विविध उपक्रमांचे आयोजन तसेच उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याबाबत चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव पर्यावरणपूरक, सामाजिक सलोखा जपत आणि शांततेत साजरा करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले.
या बैठकीस मंडळाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार मानून बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.