(फलटण | प्रतिनिधी )आंदरुड-भवानीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघाला असून, परिसरात अतिरिक्त 100 केव्ही क्षमतेचा शेती पंपासाठी नवीन डीपी (Distribution Transformer) बसविण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारे फॉल्ट आणि सिंचनातील अडचणींमधून मोठा दिलासा मिळणार आहे.
हा महत्त्वपूर्ण प्रश्न मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मा. आमदार सचिन दादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. डीपी बसविण्याच्या कामाची पाहणी करताना स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.
नवीन 100 केव्ही डीपी कार्यान्वित झाल्याने शेती पंपांना अधिक सक्षम वीजपुरवठा मिळणार असून, पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. या कामाबद्दल ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व संबंधित वीज विभागाचे आभार मानले.
या वेळी युवा नेते सोमनाथ यजगर,उपसरपंच. वैभव कर्णे. रमेश राऊत,प्रगतशील बागायतदार डॉ.भालचंद्र राऊत,माजी उपसरपंच संदीप राऊत, मच्छिंद्र राऊत, नितीन राऊत, ज्योतीराम कर्णे, रामचंद्र राऊत, अमोल उर्फ मुन्ना राऊत, अमोल किसन राऊत, आदी उपस्थित होते.