आपला जिल्हा
सातारा जि.प. समाज कल्याण सभापती पदासाठी सौ. वैशाली कांबळे यांच्या नावाची जोरदार मागणी

(जावली / अजिंक्य आढाव) – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बरड जिल्हा परिषद गटाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) उमेदवार सौ वैशाली संदीप कांबळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या या यशामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना समाज कल्याण सभापती पदा साठी संधी द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
सौ वैशाली कांबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या असून त्यांना समाजसेवेची विशेष आवड आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.एस्सी., एम.एड., डी.एस.एम. असे उच्च शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या फलटण येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजी राजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.



