आपला जिल्हा

विडणी येथे रानगव्याचा हल्ला; ६५ वर्षीय राजाराम जाधव गंभीर जखमी

(फलटण/ प्रतिनिधी) – विडणी येथे रानगव्याने राजाराम सदाशिव जाधव वय ६५ यांच्या हल्ला करुन गंभीर जखमी केले असून बारामती येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनास्थळा वरुन मिळालेली माहीती अशी की आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर विडणी येथिल कोकरेवाडी या ठिकाणी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर शेतातून रानगवा बाहेर आला असता.राजाराम सदाशिव जाधव वय ६५ हे आपल्या घरुन सायकल वर महामार्ग वरील सर्व्हिस रोडवरुन विडणी गावाकडे निघाले होते. रानगवा रोडवर दिसल्यावर ते सायकल वरुन उतरुन घाबरून पळाले परंतु रानगव्याने त्यांना दोनदा धडक देऊन टोकदार शिगांने पोटात खोलवर घुसऊन महामार्गालगतच्या शेतात शिगाने उचलून फेकून दिले.यामध्ये राजाराम जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ फलटण येथिल दवाखान्यात पाठविण्यात आले.जाधव यांच्या पोटात खोलवर रानगव्याचे शिंगे घुसल्याने फलटण येथे उपचार करणे अशक्य असल्याने त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन बारामतीला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

घटनास्थळी फलटण वनविभागाचे अधिकारी यांनी भेट दिली असून रानगव्याचा शोध घेत आहेत.जंगली रानगवा कधीही या भागात पाहायला मिळाला नाही अचानक या रानगव्याच्या दर्शनाने विडणी परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.विडणी गाव बागायत क्षेत्र असल्याने रानगव्या मुळे शेतात जायला मजूर लोकामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

कोट रानगवा हा खुप ताकदवान प्राणी असून लोकांनी त्यास हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करुन नये तसे केल्यास रानगवा हल्ला करुन शकतो फलटण बारामती येथून रेस्क्यु पथक पाचारण करणेत आले आहे रानगव्याचा शोध सुरु आहे परिसरात जर रानगव्याचा हल्ला जाणवला तर त्यास रेस्क्यु करुन नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.संबधित जखमी व्यक्तीस वनविभागा मार्फत उपचारासाठी मदत केली जाईल असे वन परिक्षेञ अधिकारी निकीता बोटकर यांनी माहीती दिली.

(फोटो- सतीश कर्वे /विडणी येथे रानव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राजाराम जाधव)

Related Articles

Back to top button
Don`t copy text!