आपला जिल्हा

९ मे रोजी नितीन गडकरी यांचा सन्मान सोहळा : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण

(फलटण/ प्रतिनिधी)- किसनवीत सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक देशभक्त किसन उर्फ आबासाहेब वीर यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार देशाचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांना महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते देण्यात येणार असल्याची माहिती खासदार नितीन पाटील यांनी दिली आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खासदार नितीन पाटील म्हणतात यावेळी मंत्री मकरंद पाटील मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून सदरचा कार्यक्रम कॉलनी ग्राउंड किसनवीर नगर ता.वाई येथे शनिवार दिनांक ९ मे २०२६ रोजी सकाळी ठीक १९ वाजून ३० मिनिटांनी करण्यात येणार आहे तरी सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार नितीन पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!