आपला जिल्हा

जावली गावचे बहुआयामी नेतृत्व सयाजी बरकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

(जावली /अजिंक्य आढाव ): जावली गावचे बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सयाजी बरकडे यांचा आज, दि. ६ मे रोजी वाढदिवस उत्साहात साजरा होत आहे. ग्रामीण भागात जन्म झाला असला तरी उच्च विचारसरणी, समाजाभिमुख वृत्ती आणि कार्यतत्परता यामुळे त्यांनी गावासह परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 शेतकरी कुटुंबातून आलेल्या बरकडे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात ठसा उमटवला आहे. गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत त्यांनी युवकांना योग्य दिशा देण्याचे काम सातत्याने केले आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडले असून, गरजू नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन तसेच क्रीडापटूंना संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच सर्व स्तरातून त्यांना मोठा सन्मान आणि जनसमर्थन लाभत आहे.

वाढदिवसानिमित्त गावातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे.

सयाजी बरकडे यांच्या नेतृत्वगुणांना अधिक वाव मिळो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस यश लाभो, अशा शुभेच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!