आपला जिल्हा

जावल सिद्धनाथ यात्रेत फलटण ग्रामीण पोलिसांचा कडक बंदोबस्त : सर्व कार्यक्रम शांततेत पार

(जावली /अजिंक्य आढाव )– जावली ता. फलटण येथील प्रसिद्ध जावल सिद्धनाथ यात्रेदरम्यान फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने कडक व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रेनिमित्त मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.

उपनिरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बरड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ, बरड बीट अमलदार अमोल चांगण व सहकारी पोलिसांनी यात्रेतील प्रत्येक कार्यक्रमावर बारकाईने लक्ष ठेवले.

देवाच्या हळदी सोहळा, पारंपरिक लग्न सोहळा तसेच बकरी धडका – बगाडे या दिवशी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रभावी नियोजन केले होते.

या चोख बंदोबस्तामुळे यात्रा शांततेत व सुरळीत पार पडली असून भाविकांनीही पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!