आपला जिल्हा

निवडणूक तोंडावर ; आरोपांची धार वाढली ! जावलीत भाजपा विरुद्ध ‘जावल सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी’ आमनेसामने

(जावली / अजिंक्य आढाव) – ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर जावलीत निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असून भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी ‘जावल सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी’ पॅनलवर घणाघाती आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढले जात आहे.

भाजपचे कार्यकर्ते माऊली चवरे, कुमार अवघडे, किशोर करे यांनी आरोप विठोजी कंबळोजी घाटा चे आता कामे सुची लागली का असा खडा सवाल केला आहे..?

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, “गेल्या काही वर्षांत प्रलंबित असलेली विकासकामे निवडणूक जवळ येताच अचानक सुचू लागली आहेत. गावाच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून आता केवळ मतांसाठी कामांचा दिखावा केला जात आहे.”

विशेषतः विठोजी–कमळोजी घाट रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. त्या कामाबाबत ठोस निर्णय झाला नसताना आता पुन्हा त्याच मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, ‘जावल सिद्धनाथ ग्रामविकास आघाडी’कडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून “गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. निवडणूक जाहीर झाली म्हणून कामे सुरू झालेली नाहीत; प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती,” असा प्रतिवाद करण्यात आला आहे.

जावलीतील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलताना दिसत असून येत्या निवडणुकीत नेमके कोण बाजी मारणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. गावात सध्या राजकीय चर्चा रंगू लागल्या तारखा कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागुन राहिले असुन रणधुमाळी लवकरच शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!