आपला जिल्हा

सोनगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी ; गुणवंतांचा गौरव, युवकांना प्रेरणेचा संदेश

(फलटण/ प्रतिनिधी)अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोनगाव बंगला ता फलटण येथे हनुमान मंदिरात अभिवादन व गुणवंत सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश निकाळजे यांनी प्रभावी व ओजस्वी शैलीत केले, तर प्रस्ताविक पोपटराव बुरुंगले यांनी कार्यक्रमामागील प्रेरणा व उद्देश स्पष्ट केला. यावेळी कु. हर्षल सुरेश पवार, शिवराज रमेश वाघ, स्वरांजली अमर भोसले, श्रुती विठ्ठल भोसले, आरोही अमोल गायकवाड तसेच जि. प. शाळा राजाळे सर्कलचे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांनी मनोगत व्यक्त करत शिवरायांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.

या प्रसंगी सांगवी बंगला येथील कु. स्वप्नाली दळवी यांची कारागृह पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल तसेच गोलाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारे श्री. जीवन घोडके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास हनुमंत दळवी, संदीप पिंगळे, दत्तात्रय ननावरे, राजेंद्र लांडगे, ज्ञानदेव शेंडे, पोलिस पाटील दीपक लोंढे, अमोल सस्ते, किसन सत्रे, रमेश वाघ, अमर जगदाळे, शिवाजी ढवळे, सुरेश पवार, गणेश नामदास, संकेत बुरुंगले, अमर भोसले, चिरंजीव खरात, सुरज गोरवे, गणेश कांबळे, अतुल लोंढे, सोमनाथ ओव्हाळ, लक्ष्मण गायकवाड, सुरेश गेजगे, सुधीर धुमाळ, करण गोरवे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन सर्व तरुण मंडळ सोनगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सोनगाव, शाळा व्यवस्थापन समिती सोनगाव व सोनगाव बंगला, ग्रामपंचायत व सोसायटी सोनगाव, हिरकणी महिला ग्रामसंघ सोनगाव, श्री विठ्ठल प्रासादिक भजनी व भारुड मंडळ सोनगाव तसेच ग्रामस्थ सोनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांना शिवरायांच्या विचारातून प्रेरणा घेऊन यश संपादन करण्याचा संदेश देण्यात आला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!