आपला जिल्हा
जावलीत ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; भाजपकडून ‘कामाचा लेखाजोखा’, राजे गटाच्या कामकाजावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप..!

जावली (प्रतिनिधी) – ग्रामपंचायतीची मुदत संपताच जावलीतील राजकारण तापले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप–प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघताना दिसत आहे. गावात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून प्रत्येक गट आपापली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.
भाजपकडून आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा तपशीलवार लेखाजोखा मांडण्यात येत आहे. रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, ग्रामस्वच्छता उपक्रम, सार्वजनिक बांधकामे आणि विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी याबाबत भाजप पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “आमच्या कडे सत्ता नसताना ही मागील व चालू वर्षांत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. कामे कागदावर नाहीत, तर प्रत्यक्षात दिसतात,” असा दावा भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
भाजपची सत्ता नसतानाही खासदार आणि आमदार फंडाच्या माध्यमातून निधी खालील प्रमाणे उपलब्ध करून दिले
झेंडे वस्ती डांबरीकरण
निळदरा तलाव रोड मंजूर
पोकळे वाडा चार सौंर लाईटचे दिवे दिले.
खासदार फंडातून समाज मंदिरासमोर हाय मास लाईट उपलब्ध करून दिली
आमदार फंडातून सौर लाईट उपलब्ध करून दिली
हेकळवाडी ठोंबरे वस्ती वॉटर सप्लाय चे पिण्याचे पाणी 2 वर्षापासून बंद असुन फलटण कोरेगाव चे आमदार सचिन कांबळे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वखर्चातून 35 हजार रुपये दिले.शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवत लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न
बौद्ध समाजाला समाजा मंदिरा करता निधी मंजूर.
खासदार फंडातून शेतकऱ्यांना दिला डिपी लिंबराज मंदिरा शेजारीसरकारी दवाखाना मंजूर (जागा उपलब्ध नसल्याने काम रखडले)
जनावरांचा दवाखाना (मंजूर जागा उपलब्ध नाही )
अंगणवाडी मंजूर( जागा उपलब्ध नाही )



