आपला जिल्हा

दुधेबावी पंचायत समिती गणातून राजे गटाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार – काजल सोनवलकर

(जावली /अजिंक्य  आढाव)फलटण पूर्व भागातील राजे गटाचे कट्टर समर्थक व राजकारणात सतत सक्रिय असणारे सोनवडी खुर्द गावचे अक्षय जगन्नाथ सोनवलकर ज्यांच्या पत्नी काजल अक्षय सोनवलकर यांना राजे गटाकडून संधी मिळाल्यास दुधेबावी पंचायत समित मधून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

´अक्षय सोनवलर यांची वयाच्या 17 व्या वर्षापासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मधून राजकारणात सुरुवात व राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. 30 वर्षापेक्षा अधिक राजकीय सामाजिक क्षेत्रामधून सर्वसामान्य लोकांची कामे केली असून दुधेबावी पंचायत समिती गणात मोठा मोठा जनसंपर्क असल्याने युवा कार्यकर्तीची वोट बँक असलेल्याने आपल्या पाठीशी असल्याची त्यांनी मत व्यक्त केले.

सोनवडी खुर्द ग्रामपंचायत सोसायटी राजगटाचे वर्चस्व गेले अनेक वर्ष ठेवले असून श्रीमंत रामराजे नाईक यांच्याशी एक निष्ठेने कामकाज पाहिले आहे. दुधेबावी गणात – दुधेबावी, मिरढे, शेरेशिंदेवाडी, नाईकबोमवाडी, वडले,भाडळी बु, सासकल, तिरकवाडी, भाडळी खुर्द. गावे असुन जनसंपर्क दांडगा असल्याने राजेगटातील पक्ष श्रेष्ठींनी संधी दिल्यास आपण निवडणूक मोठया ताकदीने लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!