क्रीडा व मनोरंजन
रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण पूर्व भागातील जावली ता. फलटण येथील रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जावली वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादरीकरण करत कार्यक्रमास सुरुवात झाली.कोळीगीत, मनोरंजन करणारी गाणी , देशभक्ती परगीत,साऊथ इंडियन सॉन्ग, मराठी गाणी, कार्यक्रमाच्या शेवटी वाजले की बारा या गाण्यावर ती थिरकत शेवट केला.विद्यार्थ्यांच्या कलाविष्कार, सुप्त गुणांना वाव देण्याकरता वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.
शालेय विभागात विविध स्तरावर कामकाजातुन उत्तम कामगिरीबद्दल प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या मधे







कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून , संदीप विलासराव जगताप- पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण, शरद वसंत गावडे उप कृषी अधिकारी महाड, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मोहन साहेबराव डांगे संस्थापक मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी यांच्या शुभहस्ते मार्गदर्शक म्हणून दशरथ हरिबा चवरे अध्यक्ष जाई एज्युकेशन सोसायटी जावली व पोपट हरिबा चवरे प्राचार्य सांगोला विद्यामंदिर सांगोला,बाळासाहेब गावडे माजी सैनिक, प्राचार्या कांचन चवरे मॅडम, संस्थापक अध्यक्ष प्रा. अमोल दशरथ चवरे सर्व पालक, शालेय विदयार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


