(जावली /अजिंक्य आढाव ): आगामी गणेशोत्सव २०२६ हा शांततेत, उत्साहात आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखून पार पडावा, यासाठी फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील काही वर्षांत गणेशोत्सव तसेच इतर उत्सव काळात गुन्हे दाखल असलेल्या इसमांकडून पुन्हा गैरकृत्य घडू नये, यासाठी दिनांक २४/०९/२०२६ रोजीचे ००.०१ ते दिनांक २६/०९/२०२६ रोजीचे १२.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत पोलिस ठाणे हद्दीत व तालुका हद्दीत वावर करू नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(२) नुसार मनाई आदेश पारित करण्यात आला आहे.
या प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये विशाल पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), देविदास बापू माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), संपत भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय पांडुरंग माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), रेंगराव भरत माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमर राजू माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), नेताजी प्रकाश माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), प्रकाश काळूराम माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अमोल आकाराम मोरे (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), रमेश संजय माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), अजय रघुनाथ माळी (सगुणामाता नगर, मलठण, फलटण), करण संजय सरगर (खाटीक गल्ली, फलटण), मंगेश किसन बेंद्रे (खाटीक गल्ली, फलटण), रोहन महेश सरगर (खाटीक गल्ली, फलटण), किशोर धनराज पवार (कसबा पेठ फलटण), धनराज लक्ष्मण पवार (कसबा पेठ फलटण), अमित अनिल कदम (रविवारपेठ फलटण), राहुल बजरंग पोतेकर (रविवारपेठ फलटण), सुरज हिंदुराव कदम (रविवारपेठ फलटण), बजरंग राजेंद्र खलाटे (रविवारपेठ फलटण), वरद दिगंबर भोईटे (नरसिंहचौक फलटण), प्रविण तुकाराम नाळे (जावयवाडी फलटण), किरण कुमार घोरपडे (ढवळक फलटण), अजय संभाजी भोसले (शेलारवस्ती ठाकूरकी), अभिजीत जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण), सचिन जयवंत खराडे (पवारगल्ली, फलटण), महेश विलास आवारे (मंगळवारपेठ, फलटण), हेमंत दत्तात्रय शिरतोडे (रविवारपेठ, फलटण), शिवाजी जगन्नाथ डोईफोडे (नवामळा ठाकूरकी), बिल्लाल रफिक कुरेशी (कुरेशीनगर, फलटण), इरफान उर्फ इशान इमाम बेपारी उर्फ कुरेशी (कुरेशीनगर, फलटण), आबु उर्फ अल्ताब अफसर कुरेशी (कुरेशीनगर, फलटण), मुबारक हनिफ कुरेशी (कुरेशीनगर, फलटण), शाहहुस्न जलील कुरेशी (कुरेशीनगर, फलटण), अजीम शब्बीर कुरेशी (कुरेशीनगर फलटण), शंकर रामराव जुबेकर (महात्मापुरपेठ फलटण), अजय संजय जाधव (महात्मापुरपेठ फलटण) यांचा समावेश आहे.
दरम्यान, बीएनएसएस १६८ प्रमाणे १४७० इसमांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच एक तडीपार प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बीएनएसएस कलम १२६ प्रमाणे १४, बीएनएसएस कलम १२९ प्रमाणे ०३, प्रोहिबी अॅक्ट प्रमाणे ०७, मोटार वाहन कायदा प्रमाणे ०२ व मोटार वाहन कायदा कलम १०२ प्रमाणे ०९ वाहनचालकांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश उत्सव अनुशंगाने शांतता कमिटी बैठक ०५, पोलिस मित्र बैठक ०७, पोलिस नागरिक समन्वय बैठक १०, इतर विभाग समन्वय बैठक १२ घेण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांना उत्सव काळात शांतता व सलोखा राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. श्री. निखिल पिंगळे, पोलिस अधीक्षक, सातारा, मा. डॉ. वैशाली कडकर, अपर पोलिस अधीक्षक, सातारा, श्री. धनंजय गाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाणे प्रभारी श्री. प्रशांत बल्लाळ यांनी केली आहे.