(फलटण/ प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवार यांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज अंतिम तारीख निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली होती.
आज फलटण तालुक्यातून अनेकांनी आपले जिल्हा परिषद पंचायत समिती साठी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.मात्र निवडणूक निर्णयअधिकारी यांनी अद्याप कोणी कोणी जिल्हा परिषद पंचायत व समितीसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल केली याची यादी प्रसार माध्यमांना दिली नाही.
प्रसार माध्यमांचे अनेक प्रतिनिधी १० वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात बसून होते. मात्र त्यांनाही यादी मिळाली नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा हा गचाळ कारभार निदर्शनास आल्याचे दिसून येते आजपर्यंतच्या फलटणच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीने गैर कारभार कधीही झाला नसल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर अनेकांची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.