आपला जिल्हा

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या दोन देशी गायींची सुटका ; वाहन जप्त, दोन आरोपी अटकेत

(फलटण /प्रतिनिधी): फलटण ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या दोन देशी गायींची सुटका केली असून वाहतूक करणारे वाहन जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण–पंढरपूर रस्त्यावर कुर्वली पाटी परिसरात नाकाबंदी करून अशोक लेलँड टेम्पो (क्र. MH 45 AF 2643) अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहनामध्ये अत्यंत क्रूरपणे दोरीने बांधलेल्या अवस्थेत दोन देशी गायी आढळून आल्या. गायींसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.

या प्रकरणी वाहनचालकांकडे वाहतूक परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र अथवा इतर आवश्यक कागदपत्रांची चौकशी केली असता ती सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनासह गायी ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या गायी गोशाळेत जमा करण्यात आल्या आहेत.

या प्रकरणात प्रकाश रामचंद्र वाघमोडे (साठेफाटा, माळशिरस जि. सोलापूर) व बाळू अंबू सरगर (रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे , वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मठपती, पोलीस हवालदार खरात, पोलीस हवालदार चांगण व पोलीस कर्मचारी ढोले यांनी केली.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!