आपला जिल्हा

जावली ता. फलटण येथे उन्हाच्या तडाख्यात गोड-गार कलिंगडाला ग्राहकांची पसंती

(जावली /अजिंक्य आढाव )ऐन उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे जावली (ता. फलटण) परिसरात गोड व गार कलिंगडाला मोठी मागणी निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे नागरिकांना थंडावा देणारे फळ म्हणून कलिंगडाला विशेष पसंती मिळत असून बाजारात कलिंगड खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले की, यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याने कलिंगडाची विक्री चांगली होत आहे. सकाळपासूनच ग्राहक कलिंगड खरेदीसाठी येत असून दिवसभर विक्री तेजीत सुरू असते. विशेषतः गोड आणि थंड कलिंगड ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीराला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यात याची मागणी वाढत असल्याचेही विक्रेत्यांनी नमूद केले. सध्या जावली परिसरात कलिंगड विक्रेत्यांची चांगलीच चांदी होत असल्याचे चित्र आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!