आपला जिल्हा
हरियाणा येथील 35 वी किशोर किशोरी खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

(हरियाणा /प्रतिनिधी) : कुरुक्षेत्र, हरियाणा येथे सुरु झालेल्या ३५ वी किशोर व किशोरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघांनी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
थीम पार्क मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपुर्व सामन्यात किशोर गटात महाराष्ट्र संघाने हरयाणाचा एक डाव १८ गुणांनी (२८-१०) पराभव केला. विजयी महाराष्ट्राकडून अभिराज वालंज (२.१० मी. संरक्षण), प्रफुल्ल वासावे (नाबाद १.५०, २.५० मि. संरक्षण व २ गुण), सोहम देशमुख (३ मि. संरक्षण व ४ गुण), वेदांत गायकवाड (८ गुण) यांनी उत्कृष्ट खेळ केला. हरयाणाकडून हिमान (१.४०, १.३० मि. संरक्षण व ४ गुण), योदीत (१.१५ मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला.

दुसऱ्या सामन्यात पंजाबने केरळचा चुरशीच्या सामन्यात ५ गुणांनी (३५-३०) पराभव केला. त्यात विजयी संघाकडून शिवकुमार (३.३० मी. संरक्षण व २ गुण), विरेंद्रजित (१.४० मी. संरक्षण व ८ गुण), श्याम मित्तल (१.१० मी. संरक्षण व ४ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर केरळकडून के अभय (१, १.१० मी. संरक्ष), प्रत्युश (१ मी. संरक्षण व ६ गुण) यांनी चांगला खेळ केला.
तिसऱ्या सामन्यात विदर्भ संघाने वेस्ट बंगालचा चुरशीच्या सामन्यात ५ गुणांनी (३५-३०) मात करीत उपउपांत्य फेरी गाठली. विदर्भाकडून रोशन (१.१४ मी. संरक्षण व ६ गुण), तन्मय (१, १ मी. संरक्षण व ८ गुण), कल्पेश (१ मी. संरक्षण व ६ गुण) यांनी चांगला खेळ करीत विजयात महत्वाची कामगिरी केली. तर वेस्ट बंगालकडून एसके नबी (१, १.२० मी. संरक्षण व ८ गुण), राज (१.२० मी. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. चौथ्या सामन्यात कोल्हापूर संघाने राजस्थानचा एक डाव २४ गुणांनी (४२-१८) सहज मात केली. कोल्हापूरकडून सत्यराज वाडेकर (२.१०, ३.२० मि. संरक्षण व २ गुण), गौरव माने (२ मि. संरक्षण व ८ गुण), सोहम भाटमारे (२ मि. संरक्षण व ४ गुण) यांनी चमकदार कामगिरी करत विजय मिळवून दिला. राजस्थानकडून तनिष (१.१० मि. संरक्षण व २ गुण) याने चांगला खेळ केला.
किशोरी गटात महाराष्ट्र संघाने मणिपुरचा एक डाव ३३ गुणांनी (४३-१०) पराभव केला. महाराष्ट्रकडून राही पाटील (२.१० मि. संरक्षण व ८ गुण), अपर्णा वर्धे (४.१० मि. संरक्षण व ८ गुण), वेदिका तामखडे (३ मि. संरक्षण व ६ गुण) यांनी विजयात मोलाची कामगिरी केली. मणिपूर संघाकडून आयेशा (०.५० मि. संरक्षण व २ गुण) हिने चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात विदर्भ संघाला हरयाणाकडून पराभवाचा धक्का बसला. हा सामना हरयाणाने ४ गुण आणि ३ मिनिटे राखून जिंकला. त्यात पलक (१.३०, १.५० मी. संरक्षण व २ गुण), कोमल (१.५०, १.१० मि. संरक्षण), अंजली (१.२०, १.२० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. तर विदर्भकडून मनवी (१.३० मि. संरक्षण व ४ गुण), नव्या (१.३० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी चमकदार कामगिरी केली.
किशोर गटात उपउपांत्य सामन्यात पोहचलेल्या संघांमध्ये महाराष्ट्रसह पंजाब, मणिपूर, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, दिल्ली, ओडिसा, कर्नाटक, उत्तरप्रदेश, छत्तिसगड, विदर्भ, गुजरात, कोल्हापूर, हरयाणा, तेलंगणा,किशोरी गटात उपउपांत्य सामन्यात पोहचलेल्या संघांमध्ये महाराष्ट्रासह उत्तराखंड, उत्तरप्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, कोल्हापूर, राजस्थान, केरळ, ओडिसा, गुजरात, पश्चिम बंगाल, हरियाणा, मणिपूर, कर्नाटक या राज्यांच्या संघाचा समावेश होता.



