(फलटण/ प्रतिनिधी) – साठे तालुका फलटण येथील असंख्य युवकांनी आज सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीव राजे म्हणाले की, गेल्या 30-35 वर्षांमध्ये फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केला आहे. अलीकडच्या काळात आमदारकीच्या व नगरपरिषदेच्या निवडणुकीत तालुक्याचे वातावरण गढूळ झाले होते.
मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अनेक युवक शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करीत आहेत त्यामुळे वार फिरलय अशी परिस्थिती तालुक्यामधील निर्माण झाली असल्याची प्रतिपादन श्रीमंत संजीव राजे यांनी साठे येतील कोपरासभेत सांगितले.
यावेळी बोलताना शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, निश्चितपणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेलाच बहुमत मिळेल व आपली सत्ता प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही असेही शेवटी श्रीमंत संजीव राजे म्हणाले.