आपला जिल्हा

कोळकी जि.प.गटातून युवा नेते सह्याद्री कदम यांच्यासाठी सौ.चाहत कदम यांचा हाऊस टू हाऊस प्रचार

मतदारांच्या कडून मिळतोय प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद : सह्याद्री कदमांचा विजय निश्चित

(फलटण/ प्रतिनिधी) – कोळकी जिल्हा परिषद गटामधून माजी आमदार चिमणरावजी कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम हे निवडणूक रिंगणात असून पंचायत समिती गणात अमोल दशरथ सस्ते व कोळकी गणात डॉ. अशोक गेनबा नाळे हे धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सह्याद्री कदम यांच्या पत्नी सौ. चाहत कदम या हाऊस टू हाऊस प्रचार करीत असून त्यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.सह्याद्री कदम हे फलटणचे माजी आमदार तथा विधानसभेतील तत्कालीन मुलुख मैदान तोफ चिमणराव कदम यांचे चिरंजीव असून निश्चितपणे त्यांना या निवडणुकीत चिमरावजी कदम यांची पुण्याई कामाला येणार असल्याची चर्चा कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये होत असून भविष्यात चिमणराजी कदम, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे ना. निंबाळकर यांच्या विचाराचे राजकारण करणार असल्याचेही प्रचारावेळी सौ. चाहत कदम सांगत असून जिल्हा परिषदेचा उर्वरित विकास कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी तसेच गटामधील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्या सांगताना दिसत आहेत.

त्यांच्या या प्रचाराला कोळकी जिल्हा परिषद गटातून उस्फूर्तपणे प्रतिसाद सर्वसामान्य नागरिक व मतदारांकडून मिळताना दिसत असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!