आपला जिल्हा

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात मुधोजी कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग

(फलटण/ प्रतिनिधी) 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कर्तव्यपथावरील संचालनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात “आत्मनिर्भर भारत” थीमअंतर्गत” गणेशोत्सव” सादरीकरणात मुधोजी महाविद्यालयाचे कलाविष्कार विभागातील आदित्य वाघमारे व आदित्य रणदिवे हे गुणी कलाकार चित्ररथात गणेशोत्सवातील लेझीम लोकनृत्यात सहभागी होऊन नृत्य सादर करणार आहेत .

2025 पासून महाराष्ट्र राज्याने गणेशोत्सव “राज्य महोत्सव ”   म्हणून जाहीर केलेला आहे.गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यावधीची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार , सजावट कलाकारांना मिळणार शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे . अश्या आत्मनिर्भरतेच्या चित्ररथात हे विद्यार्थी कलाकार महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत ही फलटण एज्युकेशन सोसायटी व मुधोजी महाविद्यालयाकरिता कौतुकास्पद व अभिमानाची बाब आहेअसें मत प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम सर यांनी व्यक्त केले. या विद्यार्थ्यांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर व नृत्य दिग्दर्शक राजेंद्र संकपाळ सरांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

विदयार्थीना पुढील वाटचालीस फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम यांनी “गणेशोत्सव ” चित्ररथातील सादरीकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!