आपला जिल्हा

भारतीय पत्रकार संघाच्या फलटण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

(फलटण/ प्रतिनिधी ):भारतीय पत्रकार संघाच्या फलटण येथील कार्यालयात आज मोठ्या उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी महानंदा दूध संघाचे चेअरमन डि. के. पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

कार्यक्रमावेळी प्रा. विकास शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विशद करत भारतीय संविधान याच दिवशी लागू झाल्याची माहिती उपस्थितांना दिली. धर्मनिरपेक्ष,सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक राज्य ही आपली ताकत आहे.

यानंतर भारतीय पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव, जिल्हाउपाध्यक्ष विकास शिंदे, महात्मा फुले विचार अभियानाचे प्रमुख अजितकुमार जाधव , हल्लाखोर समिती प्रमुख आप्पासाहेब तांबे, कार्याध्यक्ष राजभाऊ बोंद्रे, फलटण तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे, सचिव अमोल पवार, सहसचिव गणेश भोईटे, संघटक प्रशांत सोनवणे, सदस्य जुबेर कोतवाल, शकील सय्यद, सचिन खुडे यांच्यासह पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाच्या लोकशाही व्यवस्थेत पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भान राखून समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!