आपला जिल्हा

मूकबधिर विद्यालयात जायंट्स ग्रुप ऑफ फलटणच्या वतीने शामराव निकम यांच्या हस्ते ध्वजवंदन

(फलटण/ प्रतिनिधी) – गोळेगाव ठाकूरकी,फलटण येथील महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयात जायंट्स ग्रुप ऑफ फलटणचे अध्यक्ष शामराव निकम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त हस्ते ध्वजावंदनाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

याप्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले, सचिव सौ.वैशाली चोरमले, जायंट्स ग्रुप फलटणचे पदाधिकारी जायंट्स ग्रुपचे युनिट डायरेक्टर प्रा. प्रभाकर भोसले, शिरीन भाई शहा, उपाध्यक्ष विजयराव पोटे, सचिव सलीम शेख, मुधोजी हायस्कूल जुनियर कॉलेजचे माजी प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर बोलताना शामराव निकम म्हणाले की, महात्मा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालविण्यात येणारी ही दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले व सचिव सौ. वैशाली चोरमले यांच्या माध्यमातून या मूकबधिर मुलांना सर्व सर्व त्या सोयी सुविधा पुरविण्यात आल्या असून हा परिसर अतिशय रमणीय असा केला आहे त्यांचा हा उपक्रम निश्चितच सर्वांना प्रेरणादायी व स्तुत्य असल्याचे सांगितले.प्रारंभी प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली शिंदे यांनी विद्यालयाच्या कामकाजाची माहिती सर्वांना दिली.

यावेळी मूकबधिर विद्यालयातील मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध मानवी मनोरे उभा करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले तसेच मुलींनी ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.

मूकबधिर विद्यालयाच्या शिक्षिका सव विजया मठपती सौ. हेमा गोडसे, उपशिक्षक पवन राठोड, नितेश शिंदे, चेतन्य खरात व निर्मला चोरमले यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!