आपला जिल्हा
बरड जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाचा शिवसेना उमेदवार यांचा बरड येथील हनुमान मंदिरातून श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ

(जावली /अजिंक्य आढाव )- शिवसेनेचे बरड जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ. वैशालीताई संदीप कांबळे व बरड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. स्वाती हनुमंत आटोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बरड हनुमान मंदिरातुन सुरू करण्यात आला.
वैशाली कांबळे – श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, संजीवराजे ना. निंबाळकर यांनी तालुक्यात हरित क्रांती, धवल क्रांती, मुलांना चांगल्या प्रकारच्या शैक्षणिक वाटचालीसाठी इंजिनिअरिंग कॉलेज, एग्रीकल्चर कॉलेज, नर्सिंग कॉलेज, एम. बी.ए. कॉलेज, बी फार्मसी व बी.सी.एस. इत्यादी कॉलेजच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती केली.
माजी आमदार दिपक चव्हाण शुभारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले की – फलटणची जलक्रांती श्रीमंत रामराजे नाईक यांनी केली विरोधक फक्त श्रेय घेण्याचे काम करत आहेत.




