ताज्या घडामोडी

फलटणच्या राजकारणात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त पाठीमागून आधार देण्या पुरता राहिला आहे का ?

(फलटण/प्रतिनिधी) – फलटणच्या राजकारणात अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त पाठीमागून आधार देण्या पुरता राहिला आहे का?अशी चर्चा नागरिकांमधून दबक्या आवाजात होत आहे.

मग आमदार सचिन कांबळे पाटील यांना आपल्या पक्षाच्या अस्तित्वासाठी लढता येत नाही का ? कि पक्षातील कार्यकर्त्यांनी फक्त भाजपचाच प्रचार करायचा फक्त आमदारकी पुरता राष्ट्रवादीचा वापर केला आहे का ?असे अनेक प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात  आहेत. मूळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार, कि त्यांनी फक्त भाजपलाच आधार द्यायचा अशी चर्चा आता निष्ठावंताकडून होताना दिसत आहे.

फलटणच्या राजकारणात अशा चर्चांना  उधाण आले आहे. ह्याचे कारण एकच कि फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सन-२०२४ ला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले ह्याचा अर्थ असा कि, फलटण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात वरचढ ठरला असला तरी  त्या नंतर जेव्हा फलटण नगरपरिषद असो किंवा आत्ता चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती ची निवडणूक असो दोन्ही मध्ये महायुती म्हणून लढताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या जागा देण्यात आल्या आहेत. फलटण शहर व तालुक्यात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नावापुरता उरला नाही असे हि म्हणता येणार नाही. कारण तालुक्याचे आमदारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!