(जावली /अजिंक्य आढाव ) फलटण पूर्व गावांमधील जावली गावातील नेहमीच सामाजिक तसेच राजकीय, क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे जावली गावचे माजी उपसरपंच सयाजी बरकडे यांनी अनेक वर्षापासून जावली गावाला राजकीय क्षेत्रामध्ये कोणतेही पद नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. आमचा फक्त मतापुरता वापर होत असून नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या बरड जिल्हा परिषद गट व दुधेबावी पंचायत समिती गणा मधून जावली गावाचा समावेश असलाने मोठ्या राजकीय मतांचे गाव असून आम्हाला उमेदवारी पासुन वंचित ठेवण्याचे काम राजकीय लोकांनी केले.
ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या गावाला प्रसिद्ध असून फलटण शिखर शिंगणापूर रोडवरील गाव मध्यवर्ती ठिकाणी असल्याने बहुतांश बडे राजकीय नेते या गावाला भेट देत असतात. यापूर्वी विठ्ठलराव बाबूराव मोरे( उपसभापती ), सोमा धोंडी बरकडे(सदस्य) यांनी पंचायत समितीचे पदे भूषवले होती.
राजकारणात तिकीट मिळवण्यासाठी निष्ठा, प्रामाणिकपणा किंवा वर्षानुवर्षांचे पक्षकार्य पुरेसे राहिलेले नाही. “पैसा असेल तरच तिकीट, पैसा नसेल तर फक्त झेंडा उचलून निवडून येता येत नाही” ही कडवी वस्तुस्थिती पक्षांना मान्य असल्याने अनेक जुने, कष्टाळू कार्यकर्ते तिकीटापासून वंचित राहत आहेत.स्थानिक गटबाजी, वैयक्तिक अहंकार, पदांच्या स्पर्धा आणि मतभेद यांचा फटका प्रामाणिक कार्यकर्त्यांना बसतोय.
सध्याच्या राजकारणात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत राजकारणात तारेवरची कसरत करावी लागत आहे. दुधेबावी गणात दुधेबावी, मिरढे शेरेशिंदेवाडी, नाईकबोमवाडी, वडले,भाडळी बु. सासकल, तिरकवाडी,भाडळी खुर्द गावांचा समावेश असून जावली गावाला पंचायत समितीचे तिकीट मिळावे अशी माजी उपसरपंच सयाजी बरकडे यांनी परिश्रम न्यूज चैनल शी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.