(जावली/ अजिंक्य आढाव ): सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्हा परिषद सदस्या तथा समाजकल्याण समिती सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ. कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन करून सहकार क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.