फलटण ग्रामीण पोलीस व NHAI अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी; स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, ब्लिंकरसह विविध सुरक्षात्मक उपाययोजनांच्या सूचना
फलटण ग्रामीण पोलीस व NHAI अधिकाऱ्यांची संयुक्त पाहणी; स्पीड ब्रेकर, रिफ्लेक्टर, ब्लिंकरसह विविध सुरक्षात्मक उपाययोजनांच्या सूचना
वाजेगाव फाटा हा परिसर अपघातप्रवण बनला असून, या ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी पुढाकार घेतला. RKC प्रा. लि. कंपनीचे काम पाहणारे गोरख गोडसे तसेच NHAI च्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करण्यात आली.