(फलटण/ प्रतिनिधी ): राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते, होतकरू तरुण आणि युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले विश्वजीत निकम यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. या निमित्ताने त्यांच्यावर मित्रपरिवार, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अल्पावधीतच आपल्या मनमिळावू स्वभावाने, हुशारीने आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीने विश्वजीत निकम यांनी मित्रपरिवारात तसेच सामाजिक वर्तुळात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांशी असलेला त्यांचा संवाद, मोठा मित्रपरिवार आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ते सातत्याने सक्रिय असतात. विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्यपूर्ण सहभाग असतो. उत्सवाच्या निमित्ताने केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
युवा पिढीमध्ये लोकप्रिय असलेले विश्वजीत निकम आगामी काळात सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात आणखी सक्रियपणे योगदान देतील, अशी अपेक्षा त्यांच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे.
वाढदिवस हा केवळ आनंदाचा क्षण नसून नव्या संकल्पांचा आणि नव्या जबाबदाऱ्यांचा प्रारंभ असतो. विश्वजीत निकम यांना वाढदिवसानिमित्त निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर फलटण तालुक्याचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दीपक चव्हाण व आस्था टाईम्सचे कार्यकारी संपादक दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यवरांनी तसेच मित्रपरिवार यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.