(फलटण/ प्रतिनिधी ): मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील संगणक व व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्रथम वर्ष एम.सी.ए विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय “MCA Induction Programme – Resources, Career & Student Development” कार्यक्रम दि. 23 व 24 सप्टेंबर 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विभाग व एम.सी.ए अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच शैक्षणिक नियम, उपस्थिती, अंतर्गत मूल्यमापन, विद्यापीठाचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती व क्रेडिट सिस्टीम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने Anti-Ragging व Internal Complaints Committee (ICC) याविषयी जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Communication Skills, Presentation Skills, Group Discussion, Professional Development, Resume Writing, Internship व Career Opportunities याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच Universal Human Values, Ethics, Teamwork आणि Positive Attitude या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व डिजिटल संसाधने, ई-रिसोर्सेस, संशोधनाची सवय, उद्योग व करिअर क्षेत्रातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एम.सी.ए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव व मार्गदर्शन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळा, वर्गखोल्या व विभागातील विविध सुविधांची माहिती देण्यात आली.तसेच Aptitude Test व Quiz, Scholarship Awareness, SWAYAM, NPTEL यांसारख्या Online Course Platforms याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेण्यात आला.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, संगणक व व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख श्री. एस. एस. लामकाने तसेच विभागातील सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. विविध सत्रांमध्ये श्री. आर. आर. कुलकर्णी, सौ. एस. एल. जाधव, , मिस. एस. वाय. टिळेकर, श्री. एस. एस. दोशी, सौ. पी. एस. बोराटे , सौ. एल. एस. शेख डॉ. एस. डी. पाटील, श्री. पालवे, सौ. पी. ए. राजेमहाडिक, सौ.पी.आर.शिंदे, मिस एस. ए. यादव आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना एमसीए अभ्यासक्रम, शैक्षणिक संधी, कौशल्यविकास, करिअर नियोजन, संशोधन आणि व्यावसायिक विकास याबाबत स्पष्ट दिशा मिळाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
विद्यार्थ्यांनी इंडक्शन प्रोग्राममधून अभ्यासक्रम, करिअरच्या संधी, कौशल्यविकास व महाविद्यालयीन उपक्रमांबाबत उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले.
कार्यक्रमातील विविध मार्गदर्शनपर सत्रे ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि एम.सी.ए. च्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी उपयुक्त ठरल्याचे विद्यार्थ्यांनी अभिप्रायातून नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संगणक व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.