(जावली/ अजिंक्य आढाव ): आंदरुड माध्यमिक विद्यालय, आंदरुड येथे कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्याची तसेच नीरा उजवा कालवा आणि कोयना धरण निर्मितीतील योगदानाची माहिती यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. प्रकाश शिंदे, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा विविध क्षेत्रांच्या विकासाशी असलेला संबंध स्पष्ट करत त्यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक महाडिक सर होते. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाने केले.
यावेळी बावकर रमण विजयकुमार, सुगंधा राजेंद्र साबळे, विक्रम रामचंद्र भोसले, गौरी फुलसिंग वळवी, सावंत सर, मोरे संतोष महादेव यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बावकर सर यांनी, तर आभार प्रदर्शन साबळे मॅडम यांनी केले.