(जावली | अजिंक्य आढाव)फलटण तालुक्यातील मिरढे येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेचे शिक्षक श्री. सागर बाळासाहेब लोंढे यांना फलटण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या सागर लोंढे यांच्या कार्याचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून, सुसंस्कृत समाज घडविणे हीच खरी सेवा आहे, या विचारातून ते आपले शैक्षणिक कार्य करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव यांचा संगम घडविण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे मिरढे गावासह शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिकात भर पडली आहे.
सागर लोंढे यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल शिक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, मित्रपरिवार व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.