(फलटण/ प्रतिनिधी )मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्यानविद्या महाविद्यालयास शुभेच्छा; प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी मांडला उद्यानविद्या महाविद्यालयाच्या शैक्षणिक व विकासात्मक वाटचालीचा आढावा
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणचा 23 वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या आजवरच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करून भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयीन समितीचे व्हाईस चेअरमन श्री. शरदराव रणवरे, मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य श्री. शिरीषकुमार दोशी, महाविद्यालयीन समितीचे सदस्य श्री. रणजीतभाऊ निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर तसेच कृषी महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्यानविद्या महाविद्यालयाच्या 23 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचे स्मरण करून संस्थेच्या शैक्षणिक कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाचा आणि शैक्षणिक वाटचालीचा सविस्तर आढावा सादर केला. विद्यार्थ्यांना दर्जेदार उद्यानविद्या शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान, व्यावहारिक ज्ञान, संशोधनवृत्ती, उद्योजकता आणि कौशल्य विकास रुजविण्यासाठी उद्यानविद्या महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध शैक्षणिक, प्रात्यक्षिक, अनुभवाधारित शिक्षण आणि विस्तार उपक्रम यांची माहितीही त्यांनी दिली. उद्यानविद्या क्षेत्रामध्ये वेगाने होत असलेल्या बदलांचा विचार करून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे, त्यांना प्रत्यक्ष शेतीशी जोडणे आणि भविष्यातील कृषी क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम बनविणे, हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी सांगितले. फलटण तालुक्यातील कृषी शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली असून गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या माध्यमातून ही शैक्षणिक परंपरा अधिक सक्षम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाविद्यालयाच्या 23 वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृषी व उद्यानविद्या शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यामध्ये अशा शैक्षणिक संस्थांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले, महाविद्यालयाने आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून नावलौकिक वाढवावा, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. या वर्धापन दिन सोहळ्यास श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 23 वर्षांची शैक्षणिक वाटचाल पूर्ण करताना उद्यानविद्या शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम कृषी पदवीधर घडविण्याचा आणि कृषी क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याचा महाविद्यालयाचा निर्धार या वर्धापन दिनानिमित्त अधोरेखित झाला.
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या 23 व्या वर्धापनानिमित्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष मा. श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, मा. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक, फलटण नगर परिषद, मा. श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती, पंचायत समिती, फलटण, मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, महाविद्यालयीन समितीचे सदस्य, प्रशासकीय अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.