टेलस ऑर्गनायझेशन कडून जावली रॉयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद
(जावली/ अजिंक्य आढाव ): टेलस ऑर्गनायझेशन, पुणे यांच्या वतीने जावली रॉयल इंग्लिश अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्लास्टिक मुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्पर्धा परीक्षांची तयारी आणि सामाजिक भान जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
टेलस ऑर्गनायझेशनचे श्री.लोकेश बापट सर व त्यांची सर्व टीम श्री.विश्वास घावटे, श्री.सतेज पाषाणकर, श्री.राहुल बावडेकर आणि श्री.हणमंत प्रसाद डांगी आणि श्री. आप्पासाहेब वाघमोडे सर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला
यावेळी लोकेश बापट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण घ्यावे, स्पर्धा परीक्षांची तयारी करावी आणि शिक्षणासोबत सामाजिक जबाबदारीचे भानही जपावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून परिसर स्वच्छ ठेवणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
*”ना प्लास्टिक वापरायचं ना वापरू द्यायचं.”हा संदेश दिला
यापूर्वी टेलस ऑर्गनायझेशनच्या वतीने कॉलेजमधील विद्यार्थ्यांना स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याची सवय विकसित होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्यावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव वाघमोडे यांनी केले. यावेळी प्राचार्या कांचन चवरे मॅडम, प्रा.अमोल चवरे सर्व विद्यार्थी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.