(जावली /अजिंक्य आढाव ): धोम-बलकवडी उजवा कालवा कि.मी. १२८ ते १४७ मधील बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेच्या कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मौजे नाईकबोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन पाटील राहणार आहेत. तसेच विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामुळे संबंधित परिसरातील सिंचन व्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेमुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होऊन शेतीला फायदा होण्यास मदत होणार आहे.
भूमिपूजन सोहळ्यास परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, सरपंच-उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच महिला व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे